पंचायत समिती, दक्षिण सोलापूर

इतिहास

सोलापूर शहारालगत कर्नाटक व आंध्र प्रदेशलगत असलेला तालुका, कन्नड बहूभाषिक, सिना व भिमा नदीचा कुडल येथे संगम तसेच हेमाडपंथी व संगमेश्वर व हरीहरेश्वर मंदीर आहे.

कुसूर खानापूर येथे मकरसंक्रातीच्या वेळी जत्रा भरते.गणपतीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात.

भंडारकवठे- सोलापूर पासून ४५ कि.मी अंतरावर व कर्नाटक सिमेवर वसलेले गाव असून माघ शुध्द पौर्णिमेस महासिध्द देवाची जत्रा भरते. सदर जत्रेस कर्नाटक व आंध्र प्रदेशातून लाखो भाविक येत असतात.

दक्षिण सोलापूर तालुका सोलापूर शहरालगत वसलेला असून प्रत्येक गावातून शहरासाठी भाजीपाला, दूध इ.पूरविले जाते. तालुक्यातून प्रामुख्याने ज्वारी कडधान्ये व ऊस ही पिके घेतली जातात.

दक्षिण सोलापूर तालुका माहिती

  • लोकसंख्या :- २१०७७४
  • क्षेत्रफळ :- ११९५ वर्ग कि.मी
  • लोकसभा मतदारसंघ :- सोलापूर लोकसभा
  • विधानसभा मतदारसंघ :- दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ
  • पर्यटन स्थळे :- हत्तरसंग कुडल, वळसंग येथील विहीर, दावलमलिक दर्गा.
  • साक्षरता प्रमाण :-
  • स्त्री पुरुष प्रमाण :- ९३३
  • एकूण ग्रामपंचायती :- ८३
  • प्राथमिक शाळा :- १८८
  • अंगणवाडी :२४४-
  • प्राथमिक आरोग्य केंद्र :- ६
  • पशू चिकीत्सालय :- श्रेणी १ -१० , व श्रेणी २ -५
  • तालुक्यातील नदया :- भिमा, सिना व हरणा
  • रस्ते मार्ग :-
  • सिमेंट कारखाने :- ५
  • साखर कारखाने :- २
  • मिनी आयटीआय :- १ (मंद्रूप)
  • औष्णिक उर्जा केंद्र (NTPC) :- १ (फताटेवाडी)

21,0774

तालुक्याची लोकसंख्या

188

एकूण प्राथमिक शाळा

6

एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र:

पर्यटन


हत्तरसंग कुडल संगम

कुडल संगम हे मुख्य ऐतिहासिक महत्व असलेले एक तीर्थक्षेत्र आहे. हे सीना व भीम नद्यांच्या काठावर वसलेले आहे आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वात उत्तम ठिकाण आहे.

  • या ठिकाणचा इतिहास तब्बल आठशे वर्षांचा आहे.
  • कुडल संगम हे सर्वात प्राचीन मंदिर आहे ज्यांचे बांधकाम हेमांडपाठी स्थापत्यशैलीतून प्रेरित आहे.
  • या ठिकाणी आढळणारा लिंगम निसर्गात वेगळा असून तो इतरत्र कुठेही आढळला नाही. कुडल संगम विकास मंडळाची स्थापना या ठिकाणी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मदत करण्यासाठी सरकारने केली आहे.
  • सोलापूर व इतर परिसरातील पर्यटकांचे आकर्षण असल्याने सुटटीच्या दिवशी या निसर्गरम्य वातावरणात या ठिकाणी गर्दी असते. तसेच नदीच्या प्रवाहात पर्यटक बोटींगचा अनुभवही घेऊ शकतात
left

डॉ.बाबासाहेब आंबेडकर विहीरीचे उदघाटन

प्राचीन काळी दुष्काळ ही एक भयंकर मोठी समस्या होती. सोलापूर जिल्यातही अशावेळी ‍ पिण्याच्या पाण्यासाठी नागरीकांची खुप होरपळ व्हायची.

  • सोलापूर अक्कलकोट महामार्गावर असलेल्या वळसंग या गावातील ग्रामस्थांनी श्रमदानातून व वर्गणी गोळा करुन ‍भीमनगरवळसंग येथे 34 फूट खोल व 15 फूट रुंदीची विहीर खोदली.
  • 24 एप्रिल 1937 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जेव्हा सोलापूर ला आले तेव्हा त्यांनी स्वत: त्या विहीरीचे उदघाटन केले होते.
  • आजही ही विहीर बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देते. उदघाटन प्रसंगी त्यावेळी उपस्थित असलेल्या शाहूबाई खंडूगजधाने हया आज 100 वर्षाच्याआहेत.

.बाबासाहेबांच्या पदपावन स्पर्शाने पावन झालेल्या या विहीरीला भेट देण्यासाठी व इतिहास जाणून घेण्यासाठी सोलापूर व इतर जिल्हयातून बरेच अनुयायी भेट देतात.

left

दावलमलिकबाबांचा दर्गा बोरामणी

बोरामणीपासून चार किलो मीटर अंतरावर दावल मलिकबाबांचा प्रसिद्ध दर्गाह आहे.

  • हिंदू-मुस्लिमांसह अठरा पगड जातींचे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून दावल मलिकबाबांचा दर्गाह प्रसिद्ध आहे.
left

हेमाडपंती संगमेश्वर आणि हरिहरेश्वर मंदिर

महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यामधील दक्षिण सोलापूर तालुक्यात असलेले स्थळ आहे. तेथे अत्यंत जुनी हेमाडपंती संगमेश्वर आणि हरिहरेश्वर मंदिरे आहेत. संगमेश्वर मंदिराच्या सभामंडपाच्या तुळईवर इ.सन.१०१८ (शके ९४०)मध्ये कोरलेला पहिला मराठी शिलालेख आहे.

सोलापुरातील दयानंद कॉलेज मधील प्राध्यापक इतिहास संशोधक श्री भिडे यांनी सदर मंदिर जगा समोर आणले असून आनंद कुंभार यांनी ह्या शिलालेखाचा अर्थ लावला. हा शिलालेख ‘माय मराठी’च्या उत्पत्ती संशोधनात महत्त्वाचा गाभा ठरतो आहे.

  • १०१८ साली कोरण्यात आलेला हा शिलालेख मराठी भाषेतील आद्यग्रंथ श्री ज्ञानेश्वरीपेक्षा १८२ वर्षे जुना आहे.
  • संशोधक कुंभार यांनी दिलेल्या शिलालेखाच्या पुराव्याला पुण्याचे इतिहास संशोधक डॉ. शं. गो. तुळपुळे व वि.ल. भावे यांनीही पुष्टी दिली आहे व हा शिलालेख सर्वात पुरातन असल्याचे प्रतिपादन केले आहे.
left

छायाचित्र दालन

  • सर्व
  • सार्वजनिक कार्यक्रम
  • कार्यालयीन कार्यक्रम
  • योजना
left

App 1

App

left

App 1

App

left

App 1

App

left

App 1

App

left

App 1

App

left

App 1

App

left

App 1

App

left

Web 3

Web

left

App 2

App

left

Card 2

Card

left

Web 2

Web

left

App 3

App

left

Card 1

Card

left

Card 3

Card

left

Web 3

Web

अधिकारी

लोकप्रतिनिधी

उपयुक्त वेबसाईट